Ad will apear here
Next
‘बाबूजींचे कार्य पुढे नेत असल्याचा अभिमान’


पुणे : ‘देशाचे माजी उप-पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गातील घटकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्यातून शक्ती मिळते. बाबूजींचे हे कार्य यशस्वीपणे पुढे नेताना त्यांची मुलगी म्हणून अभिमान वाटतो,’ असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांनी केले.

अॅड. मुकेश परदेशीनवी दिल्ली येथील बाबू जगजीवन राम राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे बाबूजींच्या ३२व्या पुण्यतिथीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, अंशुल कुमार, माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आणि प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विकास आबनावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नफेसिंह खोबा, उचित माध्यमच्या रेश्मा चोळे, सुरेश जेठवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

गीतिका उत्तमचंदानीपुण्यातील उचित माध्यम जनसंपर्क संस्थेचे जीवराज चोळे आणि अॅड. मुकेश परदेशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, तर ओवायई फाउंडेशनच्या सिमरन जेठवानी आणि सिस्का एलईडीच्या संचालिका गीतिका उत्तमचंदानी यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मीराकुमार म्हणाल्या, ‘बाबूजींनी दलितांसाठी, वंचितांसाठी केलेले कार्य मोठे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबूजी यांच्या प्रयत्नामुळे आज आपण सर्वजण ताठ मानेने जगतो आहोत. त्यांचे कार्य ही आपल्या सर्वांसाठी शक्तिकेंद्रे बनवून त्यातून प्रगतीच्या वाटेवर चालायला हवे.’

सिमरन जेठवानीअभिजित अंशुलकुमार म्हणाले, ‘सर्व धर्मांचे तत्व समजून घेतले पाहिजे. सर्व धर्मांचा अभ्यास करून, सर्व धर्मांना सारखे मानून भारतीय राज्यघटना लिहिली गेली आहे. सर्व धर्म आणि धर्मग्रंथांनी मानवतेची शिकवण दिली आहे.’

आठवले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आबनावे यांनी प्रास्ताविक केले. नफेसिंह खोबा यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZJBBQ
Similar Posts
डॉ. आबनावे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार पुणे : ग्लोबल अचिव्हर्स फाउंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा ‘उत्कृष्ट वक्ता’ (बेस्ट इंटरनॅशनल स्पिकर अॅवॉर्ड) पुरस्कार येथील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनाबे यांना प्रदान नुकताच करण्यात आला. ताश्कंद (उझबेकिस्थान) येथे झालेल्या सोहळ्यात ताश्कंदचे माजी गव्हर्नर अडोलोट नासिरोरा यांच्या
डॉ. वारीद अल्ताफ यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे : दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनतर्फे (एनबीई) नवी दिल्ली १९वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील डॉ. वारीद अल्ताफ यांचा समावेश होता.
‘सीए सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रतिनिधी’ पुणे : ‘प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,’ असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य
‘सर्वंकष लोकशाहीचा विचार होणे गरजेचे’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक आणि समताधिष्ठित लोकशाहीची कल्पना मांडली होती; परंतु, त्यांच्या या कल्पनेला गेल्या ७० वर्षांत तडे गेले असून, केवळ राजकीय लोकशाहीचे अस्तित्त्व आज आपण पाहतो आहोत. त्यामुळे राजकीय लोकशाहीचे सर्वंकष लोकशाहीमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language